S M L

अवघे गर्जे पंढरपूर !

Sachin Salve | Updated On: Jul 15, 2016 11:48 AM IST

अवघे गर्जे पंढरपूर !

पंढरपूर, 15 जुलै : रूप पाहता लोचनीं, सुख झाले वो साजणी. जय जय रामकृष्णहरी....महाराष्ट्र आज जागा झाला तोच विठ्ठलनामाने....आषाढी वारीचा आज कळसाध्याय. विठ्‌ठलाच्या चरणी लीन होत अवघ्या जीविताचं साफल्य करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर आसपासच्या राज्यांमधूनही आलेला वारकरी आज पंढरपुरी पोहचला आणि विठ्ठलनामात तल्लीन झाला.

अवघे गर्जे पंढरपूर….विठ्ठल नामाचा गजर करत लाखो वारकरी आपल्या विठूरायाच्या दर्शनासाठी आणि आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठूरायाच्या भेटीसाठी एकोणीस दिवसांची वारी करुन राज्यभरातले भाविक पंढरपुरात दाखल झाले. अवघी पंढरीनगरी हरिनामाच्या गजरानं दुमदुमलीय. प्रत्येक रस्त्यावर वारकर्‍यांची अलोट गर्दी पाहायला मिळतेय. चंद्रभागेच्या तीरावर तर वैष्णवांचा महासागर लोटलाय.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सपत्निक पांडुरंगाच्या चरणी रूजू झाले. त्यांच्या हस्ते आज पहाटे शासकीय महापूजा झाली. श्रीविठ्ठलाचं दर्शन घेत त्यांनी त्याच्यावर अभिषेक केला. यावेळी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगरचे हरिभाऊ फुंदे आणि त्यांच्या पत्नी सुनिता फुंदे यांना मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाला. महापूजेच्या आधी विठ्ठल रखुमाईच्या मूतीर्ंना भरजरी वस्त्रं चढवण्यात आली. आधीच आरस्पानी असलेल्या विठुरायाचं तेज यामुळे अधिकच खुललं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2016 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close