S M L

महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होऊ दे, मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं

Sachin Salve | Updated On: Jul 15, 2016 11:44 AM IST

महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होऊ दे, मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं

पंढरपूर, 15 जुलै : शेतकर्‍यांना भरपूर धनधान्य दे,पाऊस नाही तिथे पाऊस पडू दे, महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होऊ दे असं साकडं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाला घातलं.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सपत्निक पांडुरंगाच्या चरणी रूजू झाले. त्यांच्या हस्ते आज पहाटे शासकीय महापूजा झाली. श्रीविठ्ठलाचं दर्शन घेत त्यांनी त्याच्यावर अभिषेक केला. यावेळी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगरचे हरिभाऊ फुंदे आणि त्यांच्या पत्नी सुनिता फुंदे यांना मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाला.

cm_in_pandharpur (2)शासकीय महापुजा संपन्न झाल्यानंतर सत्कार समारंभात मुख्यमंत्र्यांनी वारकर्‍यांशी संवाद साधला. कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी कोणतीही सोईसुविधा आहे की नाही याची पर्वा न करता मोठ्या भक्तीभावाने पंढरपुरात येतोय. वारकर्‍यांसाठी संपूर्ण सोईसुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही देत राहू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

तसंच विठ्ठलाची यावर्षी महाराष्ट्रावर चांगली कृपा झाली. चांगला पाऊस सर्वत्र होतोय. पण या महाराष्ट्राचा शेतकरी जोपर्यंत सुजलाम् सुफलाम् होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचं चित्र बदलू शकत नाही. महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी शेतकर्‍यांना बळ दे, आम्हाला शक्ती आणि ऊर्जा, आम्हाला आशीर्वाद दे असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला घातलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2016 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close