S M L

पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची भावाने केली हत्या

Sachin Salve | Updated On: Jul 16, 2016 02:27 PM IST

पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची भावाने केली हत्या

16 जुलै : मॉडेलिंग करते म्हणून कंदील बलोचची हत्या तिच्याच भावाने केल्याची घटना घडलीये. कंदील बलोचची ही पाकिस्तानची वादग्रस्त बोल्ड मॉडेल होती. तिच्या भाऊ गफूर बलोचने तिला वारंवार मॉडेलिंग थांबवण्यास सांगितले होते. त्यामुळे राग अनावर झाल्यामुळे गफूरने तिची राहत्याघरी हत्या केली.

पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची तिच्या सख्या भावानेच हत्या केलीये. पाकच्या मुलतान भागात त्यानं तिची हत्या केली. अनेक वेळा सांगूनही कंदील मॉडेलिंग करणं सोडत नाही, हा राग मनात धरून तिचा खून करण्यात आला. तिला अनेक दिवसांपासून धमक्या मिळत होत्या, आणि तिनं पोलिसांकडे सुरक्षाही मागितली होती. पण पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं.

कंदीलही हॉट मॉडेल म्हणून प्रसिद्ध होती. वर्ल्डकप दरम्यान पाकिस्तानने भारताला हरवले तर तिने स्ट्रीप डान्स करण्याची घोषणा करून खळबळ उडवली होती. एवढंच नाहीतर कंदील ही भारताचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीची मोठी फॅन होती.  त्यावरून पाकिस्तानमधल्या संकुचित मनोवृत्तीच्या लोकांकडून खूप टीका व्हायची. सोशलमीडियावर तिच्या अनेक स्टंटस्‌मुळे ती जगभर प्रसिद्ध होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2016 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close