S M L

नगरमध्ये 'निर्भया' प्रकरण, न्यायासाठी नागरिक रस्त्यावर !

Sachin Salve | Updated On: Jul 16, 2016 08:57 PM IST

नगरमध्ये 'निर्भया' प्रकरण, न्यायासाठी नागरिक रस्त्यावर !

अहमदनगर, 16 जुलै : अहमदनगर जिल्हा निर्भया प्रकरणामुळे हादरून गेलाय. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आलीये. माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे. या घटनेनंतर कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेड जनक्षोभ उसळलाय. कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेडला नागरिकांनी बंद केला.

कर्जतला नागरिकांनी तब्बल पाच तास रस्ता रोको केला. यावेळी संतप्त नागरिकांनी आरोपींची एसआयटीकडून चौकशी करावी अशी मागणी केलीय. त्याचबरोबर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपींना कडक शिक्षा करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

कर्जत तालुक्यातील कोपर्डीमध्ये एका नराधमाने येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिचे लचके तोडले आणि तिचा निर्घृण खून केला मिळालेल्या माहिती नुसार ही मुलगी आपल्या आजोबाकडे गेली होती. ती परतत असताना तिच्यावर आरोपी जितेंद्र शिंदे याने पाठलाग करून तिच्यावर बलात्कार केला यानंतर ही मुलगी इतरांना या घटनेची माहिती देईल म्हणून आरोपीने या मुलीचा गळा दाबून खून केला. या प्रकरणात पोलिसांनी जितेंद्र शिंदेला अटक केली आहे. अन्य काही संशयित फरार आहेत.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संतोष भवार या दुसर्‍या आरोपीला अटक केली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी पीड़ित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीही मोर्चास्थळी भेट देऊन सभागृहात आवाज उठावणार असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर पीड़ित मुलीच्या कुटुंबीयांना तीन लाखाची आर्थिक मदत करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2016 08:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close