S M L

चोराने मारला चक्क टोमॅटोवर डल्ला !

Sachin Salve | Updated On: Jul 16, 2016 09:35 PM IST

चोराने मारला चक्क टोमॅटोवर डल्ला !

मुंबई, 16 जुलै : चोर काय चोरी करेल याचा नेम नाही...मुंबई पोलिसांनी तर चक्क एका टोमॅटो चोराला अटक केलीये. या चोराने सांताक्रुझमधून एका व्यापार्‍याचे 95 कॅरेट टोमॅटोंची चोरी केली होती. राजन जयस्वाल असं चोराचं नाव आहे.

मुंबई क्राईम ब्रांचने एका अशा चोराला पकडले आहे. ज्याने सोने चांदी किंवा पैसे नाहीतर टॉमेटो चोरले आहेत. टॉमेटो चोरल्यामुळे या चोराला आता जेलची हवा खावी लागत आहे. टॉमेटो विक्रेता नसिम कुरेशी याने नाशिकहुन जवळपास दोन ते अडीच टन टॉमेटो आणले होते. गुरुवारी सांताक्रुझच्या शास्त्रीनगर या ठिकाणी हा माल विकण्यासाठी आणला होता. रात्री गाडी उभी केली आणि सकाळी जेव्हा माल विकण्यासाठी गाडीजवळ गेले तर त्यांच्या पायखालची वाळू सरकली, त्यांनी पाहिल की माल चोरीला गेलायय त्या गाड़ीमधून 95 कॅरेट माल चोरीला गेला. या नंतर नासिर कुरैशी यांनी याची तक्रार सांताक्रूझ पोलीस ठाण्यात केली.या प्रकरणी स्थानीय पोलिसांन सह गुन्हे शाखा ही चौकशी करत होती आणि चोराचा डाव फसला आणि त्याला गुन्हे शाखे क्रमांक 3 ने बेड्या ठोकल्या.

टॉमेटो चे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. 60-80 रुपये किलो टॉमेटो बाजारात विकला जातोय. 95 कॅरेट टॉमेटो म्हणजे एका कॅरेट मध्ये वीस किलो टॉमेटो असतात अश्या पद्धतीने लाखोंच्या घरात त्या टॉमेटोंची किंमत होती. एवढा महाग असलेल्या टॉमेटो सायन भागात 25 रूपयेमध्ये विकला जात होता. त्यानंतर क्राइम ब्रांचला त्याच्यावर संशय आला आणि त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याच्या गुन्हा कबुल केला. राजन जयस्वाल असं या चोराचं नाव आहे.  आणि दोघेही एकमेकांना ओळखतात. राजनला कोर्टात हजर केला असता त्याला कोर्टाने पोलीस कोठडीत पाठवलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2016 09:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close