S M L

रोगनिदान फक्त एका क्लिकवर

दीप्ती राऊत, नाशिक7 एप्रिल काळ बदलतो तशी माध्यमेही बदलतात. आरोग्य शिक्षणाचे पुरस्कर्ते डॉ. शाम आणि रत्ना अष्टेकर यांनी आरोग्यविद्या ही वेबसाईट याच धर्तीवर तयार केली आहे. आरोग्य कार्यकर्त्यांसोबतच सामान्यांनाही निरोगी करण्याचा वसा या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी घेतला आहे. डॉक्टर शाम आणि रत्ना अष्टेकर... आरोग्यसेवे इतकेच आरोग्य शिक्षण हे यांच्या कामाचे ध्येय आहे. त्यातूनच त्यांनी तयार केलेले भारत वैद्यक हे पुस्तक तळागाळातील आरोग्य कार्यकर्त्यांसाठी खूप उपयोगी ठरले आहे. हे पुस्तक त्यांनी लिहिले 1992 मध्ये. आता बदलत्या काळानुसार त्यांनी या प्राथमिक आरोग्य शास्त्राच्या ई-आवृत्या तयार केल्या आहेत. त्यांची ही आरोग्यविद्या वेबवर पोहोचली आहे. तक्ते, चार्ट, फोटो आणि व्हिडिओज यामुळे अत्यंत सोप्या आणि संवादी पद्धतीने ही वेबसाईट आजारांची, औषधांची आणि संपूर्ण आरोग्याची माहिती देते. रोगनिदानासाठी यात 16 तक्ते दिले आहेत.यातील संवादी तक्ते घेवून रोगनिदान सोप्या आणि 80 टक्के ऍक्युरेट पद्धतीने करता येतात, असे ते सांगतात. फक्त आरोग्य कार्यकर्तेच नाहीत, तर सर्वसामान्य माणसालाही ही वेबसाईट उपयोगी आहे.लक्षणांच्या माध्यमातून एकेका प्रश्नाची उकल करत ही बेवसाईट आपल्याला अचूक निदानापर्यंत पोहोचवते. आणि आरोग्याबद्दलचे ज्ञान हेच आरोग्य सुधारण्यातील पहिली पायरी ठरते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2010 02:19 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2010 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close