S M L

कोपर्डी प्रकरणाने महाराष्ट्र सुन्न,पण राष्ट्रवादीचे आमदार बाजोरिया डुलक्यात धुंद

Sachin Salve | Updated On: Jul 19, 2016 04:51 PM IST

कोपर्डी प्रकरणाने महाराष्ट्र सुन्न,पण राष्ट्रवादीचे आमदार बाजोरिया डुलक्यात धुंद

19 जुलै : कोपर्डी निर्भया बलात्कार प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र सुन्न आणि स्तब्ध झालाय. विधानसभेत विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली पण, राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया याला अपवाद ठरले. धनंजय मुंडे यांचं भाषण सुरू असताना संदीप बाजोरिया चक्क डुलक्या मारत होते.

विशेष म्हणजे बाजोरिया हे धनंजय मुंडे यांच्या पाठीमागेच बसले होते. सभागृहातील सदस्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर बाजोरियांना निरोप देऊन जाग करण्यात आलंय. पण, एकीकडे निर्भया सारख्या संवदेनशील प्रकरणावर चर्चा सुरू असतांना राष्ट्रवादीचेच आमदार डुलक्या काढत असल्याचं शर्मेचं चित्र कॅमेर्‍यात कैद झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2016 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close