S M L

नवी मुंबईत प्रेमसंबंधातून 15 वर्षीय मुलाची हत्या

Sachin Salve | Updated On: Jul 20, 2016 04:12 PM IST

नवी मुंबईत प्रेमसंबंधातून 15 वर्षीय मुलाची हत्या

नवी मुंबई, 20 जुलै : सैराट सिनेमातली प्रेमकथेचा झालेला करुण शेवट फक्त स्वप्नरंजन नाही तर वास्तवही आहे. प्रेमसंबंधाच्या रागातून नवी मुंबईत एका पंधरा वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आलीये. स्वप्नील सोनावणे असं या मुलाचं नाव आहे. तो अकरावीच्या वर्गात शिकत होता.

नेरुळ परिसरातच राहणार्‍या एका मुलीशी स्वप्नीलची ओळख होती. ही बाब मुलीच्या कुटुंबियांना पसंत नव्हती. त्यातून मुलीच्या कुटुंबियांनी स्वप्नील आणि त्याच्या कुटुंबियांना जबर मारहाण केली. या मारहाणीत स्वप्नीलचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नेरुळ पोलिसांची भूमिकाही संशयास्पद आहे. नेरुळ पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. पण स्वप्नीलच्या कुटुंबियांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. सागर नाईक, राजेश नाईक, साजेश नाईक, दुर्गेश पाटील आणि आशिष ठाकूर अशी या आरोपींची नावं आहेत.या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2016 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close