S M L

खडसेंची 'मंत्रिमंडळवापसी' नाहीच !, मुख्यमंत्र्यांकडून 'रेड सिग्नल'

Sachin Salve | Updated On: Jul 22, 2016 09:59 PM IST

मुंबई, 22 जुलै : आरोपांच्या मालिकेमुळे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. पण, ज्या प्रमाणे आरोप झाले त्या सर्व प्रकरणात एकनाथ खडसेंना क्लीन चिटही मिळाल्यात. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खडसेंना दाऊद प्रकरणात क्लीन चिट दिली. पण, एमआयडीसी भूखंड घोटाळ्या प्रकरणी थोडं थांबा असं सांगत 'मंत्रिमंडळवापसी' नाहीच असं स्पष्ट केलं.khadse_file_cm

भ्रष्ट नेत्यांची चौकशी करा अशी मागणी करत गेली दोन दिवस विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. आज विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या स्टाईलने उत्तरं दिली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्वच मंत्र्यांची जोरदार पाठराखण करत बॅटिंग केली. संभाजीराव पाटील निलंगेकर,पंकजा मुंडे, जयकुमार रावल आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतायत त्यावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलंय.

अलीकडच्या काळात आरोप करण्याची पद्धतचं झाली आहे. एखाद्या व्यक्तीच्या विरोधात राण उठवून द्यायचं. जयकुमार रावल यांच्यावर अशा पद्धतीने आरोप झाले की, जणू आता रावल यांनी आत्महत्याच करावी. पण, जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा रावल यांच्यावर झालेले आरोप हे राजकीय हेतूने होते असं सांगत मुख्यमंत्र्यांनी रावल यांची पाठराखण केली.

विशेष म्हणजे खडसेंवरील आरोपांना उत्तर देताना दाऊद प्रकरणात तर मुख्यमंत्र्यांनी क्लिन चिट दिली पण जमीन घोटाळ्याबाबत मात्र वाट पहायला सांगितलंय. विशेष म्हणजे, काल एकनाथ खडसे यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांचा आणि आपल्यासोबत घडलेल्या मीडिया ट्रायलाचा पाढाच वाचला.

खडसेंना जावयाची लिमोझीन कार, गजानन पाटील आणि दाऊद प्रकरणातही क्लीन चिट मिळालीये. त्यामुळे  लवकरच आपण मंत्रिमंडळात दाखल होऊ असा दावाही खडसेंनी केला होता. पण, आता पिंपरी चिंचवड एमआयडीसी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती नेमलेली आहे. त्याच्या रिपोर्टची वाट पाहू म्हणत मुख्यमंत्र्यांनी खडसेंनाही गॅसवर ठेवलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2016 06:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close