S M L

मराठवाड्यातून 100 तरुण बेपत्ता -राहुल पाटील

Sachin Salve | Updated On: Jul 22, 2016 07:29 PM IST

मराठवाड्यातून 100 तरुण बेपत्ता -राहुल पाटील

22 जुलै : परभणीसह मराठवाड्यातून 100 तरुण बेपत्ता झाल्याचा धक्कादायक खुलासा परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केलाय. काही दिवसांपूर्वीच परभणीमधून आयसिसशी संबंधीत नासेर चाऊस या तरुणाला अटक करण्यात आली होती.

गेल्या आठवड्यात परभणीमधून आयसिसच्या संशयित नासेर चाऊस या तरुणाल अटक करण्यात आली होती. य् हा मुद्दा आज परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. या संशयित दहशतवाद्याच्या घरातून बॉम्ब बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं होतं. ही अतिशय गंभीर बाब आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणीमध्ये 100 युवक बेपत्ता आहेत, असा धक्कादायक खुलासा राहुल पाटील यांनी केला. ही माहिती पोलीस रेकॉर्डला आहे मात्र या संशयित दहशतवाद्याला अटक केल्यानंतर एमआयएमने मुस्लीम युवकांना भडकावून घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता असा आरोपही पाटील यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2016 07:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close