S M L

बाळगंगा धरणासाठी जमिनी द्यायला नकार

अलका धुपकर, वरसई8 एप्रिलपेण तालुक्यात बाळगंगा नदीवर धरण बांधले जाणार आहे. नवी मुंबई, खोपोली-कर्जत भागाला औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी हे धरण बांधले जात आहे. या धरणासाठी 13 हून अधिक गावे संपादित केली जाणार आहेत. मात्र शेतकर्‍यांना दिला जाणारा जमिनीचा मोबदला, पर्यायी जमीन याबद्दल सिडको सहकार्य करत नसल्याचा शेतकर्‍यांचा आरोप आहे. योग्य मोबदला मिळेपर्यंत जमिनी द्यायला शेतकर्‍यांनी विरोध केला आहे.गागोदे, निफाड, वरसई, आष्टा अशा एकूण 13 गावची 975 हेक्टर जमीन सिडकोच्या प्रस्तावित धरणाखाली जाणार आहे. पाच वर्षानंतर हे धरण पूर्ण होणार आहे. धरणासाठी 643.45 कोटी खर्च अपेक्षित आहे. धरणाची पाणी साठवणूक क्षमता 144.168 दशलक्ष घनमीटर असेल. यासाठी 1 हजार 963 कुटुंबाचे विस्थापन होईल.यातून नवी मुंबई, नेरळ, कर्जत, खोपोली, खालापूर, पनवेल, उरण यांना पिण्यासाठी आणि औद्योगिक वापरासाठी पाणी देण्यात येईल.शहराची तहान भागवताना अजून किती गावांना उजाड करणार? असा सवाल शेतकरी सरकारला विचारत आहेत. पावसाळ्यात भाताचे आणि उन्हाळ्यात भाज्या, कडधान्यांचे भरघोस पीक देणारी येथील जमीन आहे. आणि शेतकर्‍यांचे पुनर्वसन सुरू करण्याधीच सिडकोने धरणाचे बांधकामही सुरू केले आहे.यामुळे बाळगंगेचं पाणी साठण्याआधीच पेटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 8, 2010 09:59 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 8, 2010 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close