S M L

'कबाली' विराट, टेस्टमध्ये झळकावली डबल सेंच्युरी !

Sachin Salve | Updated On: Jul 22, 2016 09:55 PM IST

'कबाली' विराट, टेस्टमध्ये झळकावली डबल सेंच्युरी !

22 जुलै : वनडे आणि टी-20मध्ये रन्सचा पाऊस पाडणार्‍या विराट कोहलीने टेस्ट मॅचमध्ये आपला धडाका दाखवून दिलाय. वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट सामन्यात विराटने डबल सेंच्युरी झळकावलीये. कोहलीनं 281 बॉल्समध्ये 200 रन्स तडकावले आहे. टेस्ट क्रिकेटमधली विराटची ही पहिलीच डबल सेंच्युरी आहे.

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पहिल्या टेस्टचा पहिला दिवस भारतीय बॅट्समननी गाजवला. त्यात भर पडली ती विराट कोहलीची.

नेहमीप्रमाणे विराटने विराट खेळी करून टीम इंडियासाठी धावाचा डोंगर उभा केलाय. पहिल्या दिवशी नाबाद 143 रन्सच्या खेळीनंतर विराटची फटकेबाजी सुरूच होती. विराटने 281 बॉल्समध्ये 200 रन्स करत पहिली वहिली सेंच्युरी झळकावलीये. त्याच्यासोबतील आर अश्विन 64 रन्सवर खेळत आहे.

पहिल्या दिवशी बॅटिंगसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात अडखळत राहिली. ओपनिंगचा मुरली विजय लवकर आउट झाला, त्याला गॅब्रिएलनं आऊट केलं. त्यानंतर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा यांनी दुसर्‍या विकेटसाठी 60 रन्सची भागीदारी केली. पण चेतेश्वर पुजाराही लवकर बाद झाला. दुसर्‍या बाजूनं शिखर धवननं बाजू लावून धरली, पण त्याची सेंच्युरी हुकली. तो 84 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीनं मात्र, वेस्ट इंडिजच्या बॉलर्सवर अक्षरशः हुकुमत गाजवली. दिवसअखेर विराट 143 रन्सवर नाबाद राहिला. त्यानंतर लंच टाइमपर्यंत विराटने डबल सेंच्युरीही झळकावली. या सेंच्युरीच्या बळावर भारताने 400 रन्सचा टप्पा गाठलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2016 09:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close