S M L

मायनिंगची माती शेतात

8 एप्रिलकळणे मायनिंगच्या उत्खननाचा फटका आत्तापासूनच ग्रामस्थांना बसण्यास सुरुवात झाली आहे. कंपनी खनिज काढण्यापूर्वी उत्खनन केलेली माती शेतकर्‍यांच्या शेतात टाकत आहे. यामुळे येत्या पावसाळ्यात मायनिंग परिसरातील सर्व शेती निकामी होणार आहे. शिवाय ताब्यात नसलेल्या जागेतही अतिक्रमण करून मायनिंगचे काम सुरू आहे. याबाबत कळणेचे शेतकरी आणि ग्रामपंचायतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांना कळवूनही अनेक दिवस झाले. पण महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी इथे भेट दिलेली नाही. कळणेत आलेल्या रत्नागिरी प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांनी हे अतिक्रमण बघणे हे आपले काम नाही, असे सांगत कळणेतील नदीच्या पाण्याचे फक्त नमुने तपासणीसाठी नेले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 8, 2010 10:06 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 8, 2010 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close