S M L

नराधमांचे हातपाय छाटण्यासाठी शरियत सारखा कायदा लागू करा -राज ठाकरे

Sachin Salve | Updated On: Jul 25, 2016 02:15 PM IST

नराधमांचे हातपाय छाटण्यासाठी शरियत सारखा कायदा लागू करा -राज ठाकरे

कोपर्डी - 25 जुलै : बलात्कार करणार्‍या नराधमांचे हात पाय छाटण्यासाठी शरियत सारखा कायदा लागू करवा असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. राज ठाकरे यांनी कोपर्डीतल्या बलात्कार आणि खून प्रकरणातल्या पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डीमध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं होतं. या घटनेच्या पाश्‍र्वभूमीवर राज्याच्या विविध भागातील राजकीय नेत्यांचं भेटीचं सत्र सुरू असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या कुटुंबीयांचंं सांत्वन केलं. तसंच पोलिसांकडून तपासासंदर्भात आढावाही घेतला.

यावेळी माध्यमांशी बोलतांना राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. राज्यात बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. हे सगळं थांबवण्यासाठी शरियत सारखा कायदा लागू करण्याची गरज आहे. अशा कायद्यामुळे बलात्काराच्या प्रकरणात नराधमाचे हातपाय छाटणं आवश्यक आहे. परत कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे त्यामुळे असे कायदे आले तर असे प्रकरण थांबतील असा दावा राज ठाकरेंनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2016 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close