S M L

विद्यापीठांचे होणार विभाजन

8 एप्रिलमुंबई, पुणे, नागपूर या विद्यापीठांचे लवकरच विभाजन होणार आहे. याबाबतची घोषणा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत केली. या विद्यापीठांशी संलग्न असलेल्या कॉलेजेसची संख्या वाढल्याने हे विभाजन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. असे विभाजन करताना मुंबई, पुणे विद्यापीठांची नावे मात्र कायम राहणार आहेत. मात्र नागपूर विद्यापीठाच्या विभाजनातून पुढील वर्षापर्यंत गोंडवाना नावाचे स्वतंत्र विद्यापीठ अस्तित्वात येईल. यासोबतच सर्व विद्यापीठांमध्ये समान अभ्यासक्रम सुरु करण्याची घोषणाही टोपे यांनी केली आहे. आरोग्य विद्यापीठाच्या धर्तीवर महाराष्ट्र तंज्ञविज्ञान विद्यापीठ आणि संगीत, नृत्याच्या अभ्यासक्रमासाठी पुण्यात ललित विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 8, 2010 10:50 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 8, 2010 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close