S M L

गोळाफेकपटू इंद्रजित सिंग डोपिंग टेस्टमध्ये दोषी

Sachin Salve | Updated On: Jul 26, 2016 01:43 PM IST

गोळाफेकपटू इंद्रजित सिंग डोपिंग टेस्टमध्ये दोषी

26 जुलै : भारताच्या ऑलिम्पिकवारीच्या चमूला आज दुसरा धक्का बसलाय. भारताचा गोळाफेकपटू इंद्रजित सिंग हा डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळलाय.

रिओ ऑलिम्पिकसाठी इंद्रजितसिंगची निवड झाली होती. रिओ ऑलिम्पिकसाठी निवड झालेला आणि डोपिंगमध्ये दोषी सापडलेला हा दुसरा खेळाडू आहे. अँड्रो स्टिरॉन आणि इडिओ कोलॅनो लोन या बंदी असलेल्या उत्तेजक द्रव्यांचे नमुने इंद्रजितच्या शरीरात आढळलेत.

इंद्रजित हा आशियाई चॅम्पियनशीप, आशियाई ग्रँड प्रिक्स आणि वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचा गेल्या वर्षीचा विजेता आहे. 28 वर्षांच्या इंद्रजीत हा पंजाबचं प्रतिनिधीत्व करतो. उत्तेजक द्रव्य चाचणीत तो दोषी आढळल्यानं त्याच्या ऑलिम्पिकवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

इंद्रजीत सिंगची कारकीर्द

- गोळाफेकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व

- 21व्या आशियाई ऍथलॅटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक

- आशियाई स्पर्धेत गोळाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावणारा आठवा खेळाडू

- 2013 च्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेत रौप्यपदक

- मंगळुरूतील फेडरेशन चषक सीनिअर स्पर्धेत सुवर्णपदक

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2016 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close