S M L

'क्षणभर विश्रांती'चा प्रीमियर उत्साहात

भाग्यश्री वंजारी, मुंबई8 एप्रिलअभिनेता सचित पाटील दिग्दर्शित क्षणभर विश्रांती हा सिनेमा या शुक्रवारी रिलीज होत आहे. या सिनेमाचा प्रीमियर सोहळा गाजावाजात पार पडला. भरपूर काम आणि अभ्यास करुन जर तुम्हाला कंटाळा असेल तर आता वेळ आली आहे, क्षणभर विश्रांतीची...हे आम्ही नाही तर आगामी सिनेमा क्षणभर विश्रांतीची टीम सांगत आहे...अभिनेता सचित पाटील यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेला हा सिनेमा म्हणजे सुट्टीसाठीची मेजवानी असेल.या सिनेमाचा प्रीमियर सोहळा नुकताच पार पडला. यात संजय जाधव, भरत जाधव, गुरु ठाकूर, संतोष जुवेकर, अजित परब आदी सहभागी झाले होते. अर्थात क्षणभर विश्रांतीबद्दल बोलताना हा सिनेमा आणि त्यातील कलाकारांचे कौतुक करायलाही हे सेलिब्रिटीज विसरले नाहीत. सचिन आणि त्याच्या टीमची ही क्षणभर विश्रांती प्रेक्षकांना किती भावेल हे नऊ एप्रिलनंतर म्हणजेच सिनेमा रिलीजनंतरच कळेल...

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 8, 2010 12:04 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 8, 2010 12:04 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close