S M L

राज्यात सीमी आणि आयसीसची अभद्र युती, एनआयएच्या आरोपपत्रातली धक्कादायक माहिती

Samruddha Bhambure | Updated On: Jul 27, 2016 02:44 PM IST

Isis members in Aleppo, Syria

27 जुलै :  गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात आयसिस सक्रिय झाल्याच्या बातम्या येत आहेत. राज्यात अचानक आयसिस कसं काय सक्रिय झालं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं उत्तर एनआयएच्या आरोपपत्रात आहे. महाराष्ट्रात आयसिस आणि सिमीचं संधान असल्याची धक्कादायक बाब या आरोपपत्रात उघड झाली आहे.

Students Islamic Movement of India, अर्थात सिमी, ही संस्था महाराष्ट्रात गेली अनेक वर्षं सक्रिय आहे. सरकारनं खूप आधी सिमीवर बंदी घातली आहे. त्यामुळेच आता राज्यात आयसिसचं काम सिमीचे कार्यकर्ते करतायेत की काय, असा प्रश्न पडतोय.

18 डिसेंबर 2015 रोजी पुण्यात सिमीची आयसिसबाबत बैठकही झाली होती, असा एनआयचा दावा आहे. राज्यात जुनूद उल खलिफा फिल हिंद या संघटनेची स्थापनाही करण्यात आली आहे. राज्यातील तरुणांची आयसिसमध्ये भरती करणे आणि सोशल मीडियामधून तरुणांना भडकवण्याचं काम ही संघटना करते आहे. एवढंच नाही, तर शफी अरमार आणि अंजान भाई हे दोघं सीरियात बसून राज्यात सिमीची सूत्र हलवतायेत, असाही एनआयएला संशय आहे.

काय आहे एनआयएच्या आरोपपत्रात?

- राज्यात सिमी आणि आयसिसचं संधान

- 18 डिसेंबर 2015 रोजी पुण्यात सिमीची आयसिसबाबत बैठक

- जुनूद-उल-खलिफा फिल हिंद या संघटनेची स्थापना

- संघटनेमार्फत तरुणांना आयसिसमध्ये भरती करण्याचा प्रयत्न

- सोशल मीडियावरून भडकवण्याचाही प्रयत्न

- सीरियातून हलतायेत सिमी आणि आयसिसची सूत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2016 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close