S M L

'मैत्रेय'मुळे फसलेल्या गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार !

Sachin Salve | Updated On: Jul 27, 2016 05:38 PM IST

नाशिक, 27 जुलै : मैत्रेयतील ठेवीदारांचे पैसे परत देण्याचा निर्णय जिल्हा सत्र न्यायलायन दिलाय ,नाशिक पोलिसांनीही तत्परता दाखवल्याने वीस लाख गुंतवणूकदारांना जवळपास 1400 कोटी रुपये परत मिळणार आहे. 6 महिन्यात कोर्टाने दिलेला हा निर्णय ऐतिहासिक निर्णय म्हणता येईल असं नाशिक पोलीस आयुक्तांनी सांगितलंय.

money_APआर्थिक फसवणुकीची शेकडो प्रकरणे समोर येत असतात. पोलीस गुन्हे दाखल करतात. आरोपींना अटकदेखील होते. मात्र, ठेवीदारांना पैसे परत मिळत नाहीत. मैत्रेय प्रकरणात वेगळे घडलंय. पोलिसांचा तपास उजवा ठरला. तपासाधिकार्‍यांनी संकलित केलेले पुरावे योग्य पद्धतीने कोर्टासमोर मांडल्याने. याचा परिणाम म्हणून पुढील आठवड्यापासून पैसे परत करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे.

तपास योग्य पद्धतीने झाल्याचे कोर्टाच्या निर्णयामुळे सिद्ध झाले.आता प्रत्येक आठवड्याला प्राधान्यक्रम ठेवीदारांना पैसे परत करण्यात येणार आहे. या प्रकरणात वीस लाख गुंतवणूक दारांना जवळ पास 1400 कोटी रुपये परत मिळणार आहे. 6 महिन्यात कोर्टाने दिलेला हा ऐतिहासिक निर्णय म्हणता येईल.

पैसे परत देण्याच्या बोलीवर 'मैत्रेय'च्या संचालिका वर्षा सत्पाळकर, तसंच इतर संचालकांचा जामीनही मंजूर करण्यात आला. आतापर्यंत एसक्रो खात्यात जवळपास साडेसहा कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. इतर रक्कम मैत्रेय कंपनी त्यांच्या प्रॉपर्टी विकून ठेवीदारांना परत देणार असल्यानं ठेवीदारांनी समाधान व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2016 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close