S M L

ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Jul 28, 2016 04:46 PM IST

ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ यांचं निधन

28 जुलै : मराठी रंगभूमीवरील हरहुन्नरी अभिनेते नंदू पोळ यांचं गुरुवारी निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. नंदू पोळ यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज वैकुंठमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

घाशीराम कोतवाल नाटकाच्या नांदीवर पदन्यास करणार्‍या कलाकारांच्या रांगेतील सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी वेटरची भूमिका नंदू दादांनी साकारली होती. शिवाय 'गाढवाचं लग्न' या चित्रपटात त्यांनी राजादेखील भूमिका साकारली होती. मोठ्या पडद्यासह नंदू दादांनी छोड्यापडद्यावरही आपला ठसा उमटवला होता. 'नाजुका' मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला धम्य्राची भूमिकाही नदू दादांनी साकारली होती. अभिनया व्यतिरिक्त गणपती मंडळांच्या देखाव्यांमागचे शब्द-सूर ध्वनीमध्ये बांधण्यासाठी रात्र-रात्र जागवणारा तंत्रज्ञ, थिएटर ऍकॅडमीचे एक संस्थापक-सदस्य म्हणून ते कार्यरत होते. पडद्यावर आणि पडद्यामागील अष्टपैलू भूमिका साकारणारे नंदू पोळ कायमच प्रेक्षकांच्या आठवणीत राहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2016 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close