S M L

सायन हॉस्पिटलमध्ये जन्मले तीन हात आणि दोन तोंडाचे बाळ

Sachin Salve | Updated On: Jul 28, 2016 10:31 PM IST

सायन हॉस्पिटलमध्ये जन्मले तीन हात आणि दोन तोंडाचे बाळ

मुंबई, 28 जुलै : मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये दोन तोंडाच्या बाळाचा जन्म झालाय. बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहे. बुधवारी रात्री या बाळाचा जन्म झालाय. बाळाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

सायन चाळीत राहाणार्‍या शाहीन खान नावाच्या 26 वर्षीय महिलेला 27 तारखेला सकाळी 9.25 ला सयामी जुळी मुलं झालं. ही मुलं आजपर्यंत पाहाण्यात आलेल्या केसेसपेक्षा फारचं किचकट शरीर रचना घेवून जन्माला आले आहे. या बाळांना दोन डोकी दोन माना,आहेत.  सायन हॉस्पिटलमध्ये दोन तोंडी बाळाचा जन्म झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे या बाळाची प्रकृती उत्तम आहे. ज्यावेळी अशा बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याच्या प्रकृतीला धोका असतो. शक्यता अशी असते की, असे बाळ फार दिवस जिवंत राहत नाही. परंतु, हे बाळ वैद्यकीय क्षेत्रात एक अद्भूत चमत्कार मानलं जात आहे. गर्भातच अशा बाळांची वाढ होते. 50 हजारांमध्ये अशा बाळाचा जन्म होतो. खास करून यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त असते. या बाळाचे ह्रदय आणि लिव्हर एकत्र जोडलेले असते. त्यामुळे शस्त्रक्रिया करून दोघांना वेगळे करावे लागते. अशा केसेसमध्ये एका बाळाला मुकावे लागते अशी माहिती स्त्री रोग तज्ञ अलका गोडबोले यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2016 08:22 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close