S M L

आंबेडकर भवनाच्या एकाही दगडाला हात लावायचा नाही : कोर्ट

Sachin Salve | Updated On: Jul 29, 2016 07:24 PM IST

आंबेडकर भवनाच्या एकाही दगडाला हात लावायचा नाही : कोर्ट

मुंबई, 29 जुलै : आंबेडकर भवनाच्या एकाही दगडाला हात लावू नका आणि दोन्ही पक्षांना कोणताच वाद करू नका नाहीतर कायदेशीर कारवाई करू असा आदेशच मुंबई हायकोर्टानं दिलाय . यासंदर्भात पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. आंबेडकर भवनाचं काम श्रमदानातून करण्याचं आवाहन भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी समाजाला केलं होतं.

दादर येथील बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक चळवळीसाठी उभारलेलं हे आंबेडकर भवन नामशेष झालंय. पिपल्स इम्प्रुमेंट ट्रस्टने मध्यरात्री कुणाला खबर न लागू देता ही आंबेडकर भवन जमीनदोस्त केलं. त्यांच्या या कृत्यामुळे दलित चळवळीत संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. आंबेडकर भवनाची इमारत मोडकळीस असल्याचा दावा ट्रस्ट कडून करण्यात आला. पण, ही इमारत मजबूत असल्याचा रिपोर्ट पालिकेच्या अभियंत्यानं दिल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. या प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. आज झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने प्रकाश आंबेडकरांना फटकारून काढलं. पुढील आदेश येईपर्यंत आंबेडकर भवन येथील एकाही दगडाला हात लावायचा नाही. तिथे कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही आणि कोणताही वाद घालायचा नाही असे आदेश कोर्टाने दिले आहे. जर कुणी कायदा हातात घेतल्यास पोलिसांना कारवाई करावी असे आदेशही पोलिसांना कोर्टाने दिलेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2016 05:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close