S M L

वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरुन सत्ताधार्‍यांमध्ये जुंपली, रावते -भाजप आमदारांमध्ये बाचाबाची

Sachin Salve | Updated On: Jul 29, 2016 06:29 PM IST

divakar ravate29 जुलै : वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरुन विधानसभेत सत्ताधार्‍यांमध्येच जुंपली. ही संयुक्त महाराष्ट्राची विधानसभा आहे असं सुनावत शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी भाजपच्या आमदारांना फैलावर घेतलं.  तर काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी जो कोणी महाराष्ट्राचे तुकडे पाडतील त्यांचे तुकडे पाडू असं वक्तव्य केलंय.

वेगळ्या विदर्भात मुद्यासंदर्भात भाजप खासदार नाना पटोले आज लोकसभेत मुद्दा मांडणार आहे. या संदर्भातील पत्रिका प्रसिद्ध झाल्यानं त्याचे पडसाद आज विधिमंडळातही उमटले. या पत्रिका संदर्भात नारायण राणे यांनी विधानपरिषदेत भाजपनं आपली भूमिका स्पष्ट करावी आणि जे महाराष्ट्राचे तुकडे पाडतील त्यांचे तुकडे पाडू असंही वक्तव्य राणे यांनी केले. राणे यांनी केलेल्या वक्तव्य विरोधात विधानसभेत विदर्भावादी भाजप आमदारांनी घोषणबाजी सुरू केली. यावेळी शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत घोषणाबाजी करू नका हे संयुक्त महाराष्ट्राची विधानसभा आहे असंही रावते यांनी विदर्भावादी आमदारांना खडसावून सांगितलं. .यावेळी रावते आणि भाजप आमदारांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे दोन्ही सभागृहात झालेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2016 06:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close