S M L

'आता बस्स !', गावकर्‍यांनी विनयभंग करणार्‍या आरोपींची घरं जाळली

Sachin Salve | Updated On: Jul 30, 2016 03:04 PM IST

'आता बस्स !', गावकर्‍यांनी विनयभंग करणार्‍या आरोपींची घरं जाळली

अहमदनगर - 30 जुलै : जिल्ह्यातील कोपर्डी निर्भया प्रकरणाला काही दिवस उलटत नाही तेच भांबोरा गावात एक अल्पवयीन मुलीची छेडछाड करून विनयभंग करण्यात आलाय. संतापलेल्या गावकर्‍यांनी 'आता बस्स' म्हणत आरोपींच्या झोपड्या जाळून टाकल्यात. एवढंच नाहीतर काल दमदाटी करणार्‍या पोलिसांनाही सहा तास डांबून ठेवलं होतं. या सर्व प्रकारमुळे कर्जतचे आमदार आणि जलसंपदा मंत्री राम शिंदे हे आज भांबोर्‍यात दाखल झाले आहे.nagar_bhamori

अहमदनगरला कर्जतमधील कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्काराची घटना घडली होती. आणि याच तालुक्यातील भांबोरा इथं आणखी एक अल्पवयीन मुलीवर विनयभंग करण्यात आलाय. सुदैवाने नातेवाईक आणि गावकर्‍यांच्या नजरेस ही घटना आल्यामुळे त्यांनी पीडितेची सुटका केली. संतापलेल्या जमावाने नराधमांना पकडून चांगलाच चोप दिला.

घटनास्थळी पोलीस पोहोचले खरे पण पोलिसांनी दारू पिऊन दमदाटी केल्यानं संतप्त नागरिकांनी आरोपीसह पोलिसांना ग्रामपंचायत कार्यालयत डांबून ठेवलं. संतप्त नागरिकांनी दगडफेक करुन पोलिसांची गाडीही फोडली. तब्बल सहा तास नागरिकांनी पोलिसांना डांबून ठेवलं. पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी घटनास्थळी भेटून नागरिकांशी संवाद साधला. bhambori_3

यावेळी एसपीनी दोषी पोलिसांना तडकाफडकी निलंबित केलं. अशोक निकम, युसुफ सय्यद, अप्पासाहेब कोळेकर यांना निलंबित करण्यात आलंय. आजही गावकर्‍यांनी या प्रकरणाच्या निषेधार्थ आरोपींच्या झोपड्या पेटवल्या, त्यात घरांचं मोठं नुकसान झालंय. ग्राम सभा घेऊन आज गाव बंद ठेवण्यात आलंय.

काय आहे प्रकरण ?

पीड़ित मुलगी दहावीत असून शुक्रवारी सकाळी शाळेत जात होती. त्यावेळी वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी आपल्या दोन सहकार्‍यांच्या मदतीनं पीडितेला रस्त्यात अडवलं आणि तोंड दाबून उसात ओढण्याचा प्रयत्न केला मात्र समोरुन मुलीचे नातेवाईक आल्यानं आरोपीनी धूम ठोकली. त्यानंतर नागरिकांनी पाठलाग करुन आरोपीना ताब्यात घेतलं.

आरोपीनी एक दिवसांपूर्वी पीड़ितेच्या वर्गातील मुलीला चिठ्ठी लिहून धमकावलं होतं. प्रेमाची मागणी करुन कोणाला सांगितल्यास कोपडच्तल्या मुलीसारखी अवस्था करण्याची धमकी दिली होती. मात्र चिठ्ठी पीड़ित मुलीच्या हाती लागल्यानं आरोपीनी तिच्यावरच अत्याचार करण्याचा कट रचला होता. कोपर्डीची दुर्घटना अजून विस्मृतीत गेली नाही त्यातच पीड़ित मुलीसारखी अवस्था करण्याची धमकी देण्यात आलीय. त्यामुळं मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2016 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close