S M L

ऑन ड्युटी गटारी महागात, पालिकेचे 7 झिंगाट कर्मचारी निलंबित

Sachin Salve | Updated On: Jul 30, 2016 07:12 PM IST

ऑन ड्युटी गटारी महागात, पालिकेचे 7 झिंगाट कर्मचारी निलंबित

30 जुलै : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांना ऑनड्युटी गटारी साजरी करणं भोवलंय. ऑफिसमध्ये दारुपार्टी झोडणारे सात कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलंय. निलंबित झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये चार अधिकारी आणि तीन चतुर्थ श्रेणी कामगारांचा समावेश आहे. आयबीएन लोकमतनं दाखवलेल्या बातमीनंतर ही कारवाई करण्यात आलीये.

kdmcकल्याण पूर्वेतील गणेशवाडी परिसरातील नागरिकांनी महापालिकेचे पाणी येत नसल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा विभागाकडे केली होती. मात्र नागरिकांनी पाठपुरावा करूनही संबंधित कर्मचार्‍यांनी जलवाहिनी बदलण्यासाठी केवळ खड्डा करून ठेवला. हा सगळा कारभार पाहून अखेर स्थानिक नागरिकांनी टाकीजवळील महापालिका कार्यालयात नेमके काय होतंय हे पाहण्यासाठी तेथे धडक मारली. त्यावेळी हे कर्मचारी गटारी साजरी करत असल्याचं लक्षात आलं. याबाबत संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांना नागरिकांनी जाब विचारला असता नागरिकांना धक्काबुक्की करून त्यांनी तिथून पळ काढल्याचे एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. इतकंच नाही तर त्यातील एकाने पळून जाताना आपली स्विफ्ट गाडीही नागरिकाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.

हे कर्मचारी आणि अधिकारी निलंबित

1. शाम सोनावणे, कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा, ड प्रभागक्षेत्र

2.सचिन घुटे, कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा, (सध्या निलंबित)

3. विनयकुमार विसपुते, कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा, ह प्रभागक्षेत्र

4. ज्ञानेश्वर आडके, कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा, ड प्रभागक्षेत्र

5. जयप्रकाश शिंदे, प्लंबर, पाणी पुरवठा, ड प्रभाग

6. महेश जाधव, कामगार, पाणी पुरवठा, ड प्रभाग

7. सचिन चकवे, कामगार, पाणी पुरवठा, ड प्रभाग

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2016 07:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close