S M L

भिवंडीत दुमजली इमारत कोसळली, 8 जण ठार

Samruddha Bhambure | Updated On: Jul 31, 2016 08:32 PM IST

भिवंडीत दुमजली इमारत कोसळली, 8 जण ठार

भिवंडी - 31 जुलै : भिवंडीतील गैबीनगरमध्ये आज सकाळी दुमजली इमारत खचल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या इमारतीमध्ये 8 ते 9 कुटुंबं राहत होती. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे इमारत खचली होती. त्यानंतर इमारत पडून 30 ते 35 जण अडकले होते. त्यातील 22 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

कोसळलेली इमारत धोकादायक म्हणून जाहीर केलेली होती. पावसामुळं बचावकार्यात अडथळे येत आहेत. तरीही फायर ब्रिगेडचे जवान आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारत अतिशय दाटीवाटीच्या परिसरात असल्यानं दुर्घटनेनंतर बचाव पथकाला पोहचण्यासही अडचण येत होती.

दरम्यान, या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून सहा ते सात जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2016 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close