S M L

येत्या 48 तासात लातूरकरांना मिळणार नळाने पाणी

Samruddha Bhambure | Updated On: Jul 31, 2016 09:16 PM IST

येत्या 48 तासात लातूरकरांना मिळणार नळाने पाणी

लातूर – 31 जुलै :  लातूरमध्ये काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु झाली आहे. त्यामुळे इथल्या साई प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता लातूरकरांना येत्या 48 तासात नळाने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त भाग म्हणून लातूर ओळखला जात असे. राज्य सरकारकडून या शहराला नुकताच चजलराणीी या एक्सप्रेसच्या माध्यमातून सांगली जिह्यातून लातूरला पाणी पुरवठा करण्यात आला होता. इतकी भीषण परिस्थिती लातूरकरांची होती. त्यांना दररोज पाणी मिळत नव्हते.

मात्र, आता या शहरामध्ये रात्रभर पडणाऱया मुसळधार पावसामुळे साई प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने लातूरांना येत्या 48 तासात नळाने पाणी पुरवठा करण्यात येईल, असा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2016 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close