S M L

खड्ड्यांमुळे राज्यात सातपटींनी वाढले मृत्यूचे प्रमाण

Samruddha Bhambure | Updated On: Aug 1, 2016 02:53 PM IST

खड्ड्यांमुळे राज्यात सातपटींनी वाढले मृत्यूचे प्रमाण

01 आॅगस्ट :  गेल्या काही वर्षांपासून मुंबईकरांचा सर्वात जास्त बळी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारमुळे जातोय. विशेष म्हणजे रस्त्यांवरील खड्डे, स्पीड ब्रेकर, बांधकाम सुरू असलेल्या किंवा दुरुस्ती सुरू असलेल्या रस्त्यांवर न घेतल्यामुळे होणार्‍या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली असून महाराष्ट्रात हा आकडा 700 टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे.

2015 मध्ये रस्त्यांवरील खड्‌ड्यांमुळे देशभरात 3,416 मृत्यू झाले. 2014 मध्ये हा आकडा 3,039 इतका होता. खड्‌ड्यांमुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वाढ झाली आहे. 2014 मध्ये खड्‌ड्यांमुळे 124 जणांचा मृत्यू झाला होता. ही संख्या 2015 मध्ये 812 वर पोहोचली असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. रस्त्याची देखभाल ठेवण्यास यंत्रणा सपशेल अपयशी ठरत असल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

तर दुसरीकडे कॅगने जाहीर केलेल्या अहवालानुसार मुंबई उपनगरी रेल्वेमधून पडून मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या खूपच मोठी आहे. भारतात जानेवारी 2010 ते डिसेंबर 2014 या कालावधीत 33 हजारांपेक्षा जास्त लोकं रेल्वेमधून पडून मृत्यूमुखी पडले आहेत. त्यातले निम्मे मृत्यू मुंबई लोकलमध्ये घडलेत. या अपघातांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या मंुबईकरांचे मारेकरी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2016 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close