S M L

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा राज्याचा नाही, केंद्राचा ; मुख्यमंत्र्यांचे केंद्राकडे बोट !

Sachin Salve | Updated On: Aug 1, 2016 06:53 PM IST

01 ऑगस्ट : वेगळ्या विदर्भाचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारचा नाहीये. छोटी राज्य करणं हा केंद्र सरकारच्या अखत्यारितला विषय आहे. त्याचा आणि राज्याचा काहीही संबंध नाही असं सांगत वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या कोर्टात चेंडू टोलावलाय. सेनेसह विरोधकांच्या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय.

cm_vidhansabha_bharmatakijayभाजपचे खासदार नाना पटोले यांनी वेगळ्या विदर्भाचा प्रश्न लोकसभेत मांडण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचे पडसाद राज्याच्या विधानसभेत उमटले. शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत आपल्याच मित्रपक्षाविरोधात विरोधकांसोबत मैदानात उतरले. भरात भर म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही योग्यवेळी राज्याचं विभाजन करू अशी घोषणाच करून टाकली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाजपची भूमिका मांडली. वेगळ्या विदर्भाचा कोणताही प्रस्ताव हा राज्य सरकारचा नाहीये. छोटी राज्य करणं हा केंद्र सरकारच्या अखत्यारितला विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच केंद्र सरकारच्या छोट्या राज्याच्या भूमिकेचा आणि राज्याचा काहीही संबंध नाही असंही सांगण्यास मुख्यमंत्री विसरले नाही. विदर्भाचा अनुशेष भरुन काढणे आणि विदर्भाचा विकास करणे हे राज्य सरकारचं धोरण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

नाना पटोले शेखचिल्ली, शिवसेनेची पोस्टरबाजी

दरम्यान, वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर शिवसेना आमदारांनी विधिमंडळाच्या आवारात आंदोलन केलं. शिवसेना आमदारांनी लोकसभेत अशासकीय प्रस्ताव मांडणार्‍या नाना पटोलेंचा निषेध केला. नाना पटोले हे शेखचिल्लीची उपमा देत त्यांच्या नावाचं कार्टुन सेना आमदारांनी विधिमंडळाच्या पायर्‍यावर झळकावलं. शिवसेना आमदारांचं आंदोलन सुरु असताना मुख्यमंत्री विधिमंडळात आले. मुख्यमंत्र्यांसमोर सेना आमदारांनी घोषणाबाजी सुरुच ठेवली होती. सेना आमदार आणि विरोधी पक्षांच्या आमदारांच्या गोंधळामुळे विधान परिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. तर राज्याच्या मंत्रिमंडळात राहून वेगळ्या विदर्भाची भूमिका कशी घेता असा सवाल राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी उपस्थित केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2016 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close