S M L

नरसिंग यादव डोपिंग प्रकरणात निर्दोष, 'रिओ'चा मार्ग मोकळा

Sachin Salve | Updated On: Aug 1, 2016 08:31 PM IST

नरसिंग यादव डोपिंग प्रकरणात निर्दोष, 'रिओ'चा मार्ग मोकळा

01 ऑगस्ट : डोपिंग चाचणीत 2 वेळा दोषी आढळलेल्या कुस्तीपटू नरसिंग यादव अखेर खरा 'सुलतान' म्हणून नाडाने क्लिन चिट दिलीये. नाडाने आपल्या चौकशीत नरसिंग यादव कटाचा बळी ठरल्याचं मान्य करत त्याची सुटका केलीये. त्यामुळे नरसिंग यादवाचा रिओ ऑलिम्पिकचा मार्ग मोकळा झालाय.

ऐन रिओ ऑलिम्पिकच्या तोंडावर भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादव डोंपिग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्याच्यावर कारवाई करत त्याला निलंबित करण्यात आलं होतं. या कारवाई विरोधात नरसिंग यादवने राष्ट्रीय डोंपिंग प्रतिबंध संस्था (नाडा)मध्ये धाव घेतली. नरसिंगने जितेश नावाच्या कुस्तीपटूवर आपल्या अन्नात भेसळ केल्याचा आरोप केला होता. त्याच्या तक्रारीनुसार सोनीपात पोलिसांनी जितेशला नोटीस पाठवली. तसंच सीआयएने नरसिंगचा रुमपार्टनर संदीप तुलसी आणि स्वंयपाकी चंदन यादवचा जबाब नोंदवला. पण तरीही दुसर्‍या चाचणीत नरसिंग यादव दोषी आढळला. त्याच्या जागी प्रवीण राणाला संधीही देण्यात आली. त्यामुळे नरसिंगला रिओचं दार जवळपास बंद झालं होतं.

या निकालाविरोधात नरसिंग यादवनं नाडात अपील केलं होतं. त्यावर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली होती. सलग 2 दिवसही सुनावणी झाली. यादरम्यान, बर्‍याच कागदपत्रांचा अभ्यास करण्यात आला. ती पाहून निकाल देण्यास वेळ लागत असल्याचं नाडातर्फे सांगण्यात आलं. डोपिंग प्रकरणात आपल्याला अडकवण्यात आल्याचा दावा नरसिंग यादवनं केला होता. एवढंच नाहीतर नरसिंगचे वडील पंचम यादव हे पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसले होते. अखेर आज नाडाने नरसिंग यादवला मोठा दिलासा देत रिओच्या आखाड्यात उतरण्यास परवानगी दिलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2016 06:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close