S M L

नाशिकमध्ये मुसळधार; गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने गोदावरीला पूर

Samruddha Bhambure | Updated On: Aug 2, 2016 09:41 AM IST

नाशिकमध्ये मुसळधार; गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने गोदावरीला पूर

नाशिक  - 01 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील धरणांच्या पाणीसाठयात मोठी वाढ झाली आहे. काल रात्रभरातही या भागात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे गंगापूरसह अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. गंगापूर धरणातून होणार्‍या पाण्याच्या विसर्गामुळे सध्या गोदावरीला पूर आला आहे. त्यामुळे गोदावरीच्या काठावरीला गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

मुसळधार पावसानं नाशिक जिल्ह्यातली धरणं तुडुंब भरली आहेत.पुढील काही दिवस पाऊस कायम राहिल्यास जलसाठय़ाचे एकूण प्रमाण 50 टक्क्यांहून अधिकची पातळी गाठू शकते. पाणीसाठ्याने अपेक्षेपेक्षा जास्त पातळी गाठल्याने सध्या जिल्ह्यातील गंगापूरसह सहा धरणांमधून पाण्याचा मोठ्याप्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. आज पहाटे पाच वाजल्यापासून या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नाशकात पूर स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या नद्यांच्या काठावरील गावांमधील पुराचा धोका असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची तयारी सुरू झाली आहे. तालुका स्तरावरील सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2016 08:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close