S M L

अबु जुंदालसह 7 जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

Samruddha Bhambure | Updated On: Aug 2, 2016 02:04 PM IST

अबु जुंदालसह 7 जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

02 ऑगस्ट :  औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी मुंबई विशेष मोक्का न्यायालयाने अबु जुंदालसह सात जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर प्रत्येकी 20 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर अन्य पाच जणांना 14 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली आहे.

अबु जुंदाल हा 'लष्कर-ए-तय्यबा' या दहशतवादी संघटनेचा कार्यकर्ता आहे. मुंबईतील 26/11 हल्ल्याच्या कटातील मुख्य सूत्रधार आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदू परिषदेचं प्रवीण तोगडीया यांची हत्या करण्यासाठी कट रचला होता. हल्ल्यानंतर 8 मे 2006 साली महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने 22 जणांना पकडलं होतं.

आज मोक्का न्यायालयाने अबु जुंदालसह 7 जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, असं एकून 11 जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच याप्रकरणी पाच जणांना 14 वर्षांची जन्मठेप सुनावण्यात आली आहे. तर 10 वर्षे शिक्षा भोगणार्‍या तिघांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात एक जण माफीचा साक्षीदार आहे. तर एक जण फरार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2016 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close