S M L

बहुप्रतिक्षित 'टॅल्गो' रेल्वे मुंबईत दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Aug 2, 2016 02:30 PM IST

बहुप्रतिक्षित 'टॅल्गो' रेल्वे मुंबईत दाखल

02 ऑगस्ट :   मुंबई ते दिल्ली हा प्रवास आता फक्त 12 तासांत पूर्ण करणारी अशी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'टेल्गो' ही सेमी बुलेट ट्रेन आज मुंबईत दाखल झाली आहे. या रेल्वेमुळे मुंबई ते दिल्लीदरम्यानच्या रेल्वे प्रवासाचा कालावधी काही तासांनी कमी होणार आहे. याच रेल्वेची ही दिल्ली ते मुंबई चाचणी करण्यात आली. जवळपास 45 कोटी रुपये किंमत असलेली ही रेल्वे सुपरफास्ट राजधानीपेक्षाही अधिक वेगवान असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

काल संध्याकाळी ही गाडी नवी दिल्लीहून निघाली होती. आज सकाळीच ही गाडी मुंबईत अपेक्षित होती पण दक्षिण गुजरातच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे तिला उशिर झाला. मुंबई सेंट्रल स्थानकात या गाडीला पाहायला भरपूर गर्दी झाली आहे. आज तिची तिसरी आणि शेवटची चाचणी होती. यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त त्याला मान्यता देतील, आणि मगच ही गाडी सेवेत दाखल होऊ शकेल.

सर्वाधिक वेगवान 'टॅल्गो' - हायस्पीड एक्स्प्रेस

- दिल्ली ते मुंबई

- दोन मार्गांवर यशस्वी चाचणी

- स्पॅनिश तंत्रज्ञानाच्या बनावटीची एक्स्प्रेस

- प्रतितास किमान 130 किमी वेग

- जास्तीतजास्त ताशी 200 ते 220चा वेग

- दिल्ली ते मुंबई अंतर 13 ते 14 तासांमध्ये गाठण्याची क्षमता

- किमान 3 ते 4 तासांची बचत

- ऍल्युमिनियम बनावटीच्या एका डब्याची किंमत 5 कोटी

- ट्रेन धावताना डबे अत्यंत कमी प्रमाणात व्हायब्रेट होणार

- या ट्रेनला 30 टक्के कमी ऊर्जा लागणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2016 02:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close