S M L

आदिवासी भागात 2 वर्षांत 38 हजार मुलांचा गर्भातच मृत्यू

Sachin Salve | Updated On: Aug 2, 2016 08:27 PM IST

आदिवासी भागात 2 वर्षांत 38 हजार मुलांचा गर्भातच मृत्यू

02 ऑगस्ट : मेळघाट आणि राज्यातल्या इतर आदिवासी भागामध्ये लहान मुलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण अजूनही जास्त आहे. त्यातच राज्यात गेल्या दोन वर्षांत 38 हजार मुलांचा गर्भातच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. ही आकडेवारी इथेच थांबत नाही तर दोन वर्षांत अशाच प्रकारे दोन हजार 831 मातांचा मृत्यू झाला आहे.

विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि राज्याच्या काही आदिवासी भागातील कुपोषित मुलांसाठी केंद्र आणि राज्य सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करते पण राज्यात गेल्या दोन वर्षांत 38 हजार मुलांचा गर्भातच मृत्यू झाल्याच सरकारने माहितीच्या अधिकारात सांगितले आहे.महाराष्ट्र सरकारच्या राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाकडे बालमृत्यू, अर्भकमृत्यूबाबत नागपुरचे माहिती अधिकारी कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती मागितली होती. या माहितीच्या उत्तरात राज्य सरकारने राज्यात दोनवर्षात 38 हजार मुलांचा गर्भातच मृत्यू झाल्याचे कबूल केलंय. या माहितीमुळे राज्य सरकारच्या उपाययोजना कमकुवत असल्याच पुन्हा एकदा पुढे आल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2016 08:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close