S M L

नाशिकमध्ये राज ठाकरेंनी केली पुरग्रस्त भागाची पाहणी

Sachin Salve | Updated On: Aug 3, 2016 09:58 PM IST

नाशिकमध्ये राज ठाकरेंनी केली पुरग्रस्त भागाची पाहणी

नाशिक, 03 ऑगस्ट : नाशिकमध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. आज पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळालाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केलीये. गोदावरी नदीच्या पुरानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पुरग्रस्तांची विचारपुस केली.

दरम्यान, शहरात काल 9 तासांत 141 मिली मीटर पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं गोदावरी नदीला महापूर आला होता. या पुरात शहरातील 10 पुलं पाण्याखाली गेले होते. सिहस्थ कुंभ मेळयासाठी नव्यानं बांधण्यात आलेले पंचवटीतील तीन पूल देखील पाण्याखाली होते. आज पुराच्या पाण्याची पातळी खाली आल्यानं पुलाची दुर्दशा झाल्याचं चित्र दिसलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 3, 2016 09:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close