S M L

3 महिन्यापूर्वीचा 'गुड इन कंडिशन' पूल कोसळला कसा ?

Sachin Salve | Updated On: Aug 4, 2016 03:22 PM IST

3 महिन्यापूर्वीचा 'गुड इन कंडिशन' पूल कोसळला कसा ?

03 ऑगस्ट : महाड दुर्घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरून गेलाय. दोन एसटी बसेस आणि अंदाजे 10 खासगी गाड्या सावित्री नदीत वाहून गेल्या आहेत. या दुर्घटनेत 20 जण बेपत्ता असून 2 जणांचा मृतदेह सापडला आहे. या दुर्घटनेतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे सावित्री नदीवरचा जो ब्रिटिशकालीन पूल कोसळला आहे. त्या पुलाची स्थिती शासनदरबारी चक्क 'गुड इन कंडिशन' अशी दाखवलीये. मे 2016 मधला रिपोर्टमध्ये या पुलाच्या नावापुढे तशी नोंद करण्यात आली आहे.

मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत महाड दुर्घटनेची माहिती दिली. त्यावेळी त्यांनीही या ब्रिटिशकालीन पुलाचे मे महिन्यात ऑडिट केल्याची कबुली दिली. एवढंच नाहीतर हा पूल चांगल्या परिस्थितीत होता असंही पाटील म्हणाले. मुंबई-गोवा हायवेवर एकूण 7 पूल आहेत. यातील 3 पूल हे ब्रिटिशकालीन आहे. काळ पूल (1871), सावित्री पूल (1928) आणि चोराटी पूल (1926) हे तिन्ही पूल ब्रिटिशकालीन असून सर्वांना 'ब्रीज इन गुड कंडिशन' असा शेरा देण्यात आलाय. खरं पाहता सावित्री पुलाबाबत अनेक वेळा इशारे देण्यात आले होते. पण स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज भीषण अशा दुर्घटनेला सामोरं जावं लागलंय. त्यामुळे 3 महिन्यांपूर्वी गुड इन कंडिशन पूल कोसळला कसा ? आणि त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झालाय.

सावित्रीचा प्रकोप

ज्या सावित्री नदीच्या प्रकोपात हा पूल वाहून गेलाय. त्या सावित्री नदीचा उगम महाबळेश्‍वरमध्ये होतो. सावित्री नदी पोलादपूर - महाडमधून वाहते. अपघातस्थळाहून समुद्रकिनारा 30 किमी अंतरावर आहे. महाबळेश्वरमध्ये भरपूर पाऊस पडल्याने सावित्री नदीला पूर आला. या पुराच्या पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे वाहनं समुद्रात वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई-गोवा हायवे पुलांची स्थिती मे 2016 चा शासकीय रिपोर्ट

पुलाचं नाव

बांधकाम वर्ष          

          सरकार दरबारी पुलाची स्थिती

काळ पूल            

1871

2001ला रुंदीकरण, ब्रीज इन गुड कंडिशन

लोणेरे पूल           

1970

ब्रीज इन गुड कंडिशन

गंधाई पूल          

1957

2003-2004ला रुंदीकरण, ब्रीज इन गुड कंडिशन

सावित्री पूल (जुना)

1928

ब्रीज इन गुड कंडिशन

सावित्री पूल (नवीन)

1999

ब्रीज इन गुड कंडिशन

चोराटी पूल

1926  

1999ला रुंदीकरण, ब्रीज इन गुड कंडिशन

नातुवाडी पूल

1966

2001ला रुंदीकरण, ब्रीज इन गुड कंडिशन

पुलांची जबाबदारी कोणाची?

सर्कल- नॅशनल हायवे सर्कल, वांद्रे-मुंबई

डिव्हिजन- नॅशनल हायवे डिव्हिजन, पेण-रायगड

सब डिव्हिजन- नॅशनल हायवे सब डिव्हिजन, पेण-रायगड

पनवेल-महाड-पणजी रोड-NH66

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 3, 2016 10:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close