S M L

मराठवाड्यातल्या अंध सुधाताईंनी दाखवली इतरांना प्रकाशाची वाट

15 ऑक्टोबर, मराठवाडासुधाताई खाडीलकर यांना जन्मत:च दृष्टी नव्हती. त्यामुळे अंधार-अडचणीची तक्रार करण्याची सोयच नव्हती. मेहनत आणि जिद्दीनं त्या खुर्च्या विणण्याचं काम शिकल्या. वीस वर्षापासून त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हे काम करता आहेत. मन लावून काम करणं म्हणजे काय हे सुधाताईंना पाहिल्यावर कळतं. खुर्ची विणण्याचं कामही त्या इतकं खुबीने करतात की डोळस माणूसही लाजावा.20 - 25 वर्षे त्या खुर्ची विणण्याचं काम करत आहेत. खुर्ची विणण्याचं ट्रेनिंग त्यांनी पुण्यात घेतलं. त्यांचं पतीही ब्लाईंड आहेत. त्यांना जन्मत: दिसत नव्हतं. पण दोघांनी तसाच जिद्दीनं संसारही उभारला. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांना तुमच्याआमच्यासारखं दिसतं. आसपास कर्ज फेडता आलं नाही म्हणून आत्महत्या करणारी, नोकर्‍या नाहीत म्हणून चुकीच्या मार्गाला जाणारी, प्रेमभंग झाला म्हणून व्यसनांच्या आहारी जाणारी माणसं पाहिली की सुधाताईंचं वेगळेपण कळतं आणि सुधाताईंताईंनी इतरांना दाखवलेली प्रकाशाची वाटही दिसू लागते.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2008 05:56 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2008 05:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close