S M L

ब्रिटीशांना काळजी आहे, मात्र फडणवीस सरकारला नाही - राज ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Aug 4, 2016 02:28 PM IST

Raj thackray

नाशिक - 04 ऑगस्ट : महाडमधील पूल दुर्घटनेला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ब्रिटीशांना काळजी आहे, मात्र फडणवीस सरकारला नाही, असा टोलाही राज यांनी लगावला. देशात माणसं मरण्याची किंमत राहिलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी महाड दुर्घटनेवर दिली आहे.

नाशिकमधील पूरस्थितीनंतर पाहणी करण्यासाठी राज ठाकरे गुरुवारी शहरात आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी नाशिकमधल्या पूर परिस्थितीसाठी नदी नाल्यांमध्ये टाकलेल्या बांधकाम साहित्य आणि डेब्रिज जबाबदार असल्याचं सांगितलं.

कधी कधी हा देश बीओटीवर देवून टाकावा, असं वाटतं. फडणवीस अजून विरोधीपक्षांच्या भूमिकेतून बाहेर आलेले नाही, सत्ता हातात आहे तर विदर्भाचा अनुशेष भरुन काढा, राज्यातल्या इतर समस्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी विदर्भाचा मुद्दा काढतात, फक्त वेळकाढूपणा करण्यासाठी असे उद्योग करतात, अशी टीकाही त्यांनी केली. राज्य सरकार जनतेला मूर्ख बनवत आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप सर्व एकत्र आहेत या शब्दांत राज यांनी सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी उद्धव आणि जयदेव यांच्या वादात मला पडायचे नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. जे बोललो ते खरं आहेच. कोर्टात जायची मला सवय आहे, असं मिष्किल वक्तव्यही त्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2016 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close