S M L

धावत्या लोकलमध्ये गोळी झाडून पोलिसाची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Aug 7, 2016 03:18 PM IST

मुंबई, 08 ऑगस्ट : मुंबईत धावत्या लोकलमध्ये तैनात पोलीस शिपायानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडलीये. अमर गायकवाड असं आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचं नाव आहे. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीये.

mumbai_localधावत्या लोकल ट्रेनमध्ये ड्युटीवर तैनात असलेले पोलीस शिपाई अमर गायकवाड यांनी स्वतःच्या बंदुकीने छातीत गोळी मारून आत्महत्या केली. ही घटना सकाळी साडेपाच वाजता घडली. बोरीवली ते चर्चगेट अप स्लो लोकल ट्रेनमध्ये सेकंड क्लास डब्यात अमर महादेव गायकवाड बक्कल नं 3055 यांची नेमणूक केली होती.लोकल पेट्रोलिंग कामी डयुटीवर होते.

सकाळी 05.29 वाजण्याच्या सुमारास मालाड ते गोरेगाव रेल्वे स्टेशन दरम्यान स्वत:च्या रायफलने छातीत गोळी झाडून घेतली. याची माहिती सोबत असलेले एएसआय धावडे यांना मिळाली . त्यांनी ताबडतोब जिटी रुग्णालय येथे उपचारासाठी नेले आणि आपल्या वरिष्ठांना याची माहिती दिली. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक गोडसे चर्चगेट रेल्वे पोलीस स्टेशन यांनी दिली आहे. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ही आत्महत्या आहे की चुकून गोळी लागली याचा तपास सुरू आहे अशी माहिती मिळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2016 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close