S M L

#रिओअपडेट्स : सानिया-प्रार्थना पराभूत

Sachin Salve | Updated On: Aug 7, 2016 04:02 PM IST

#रिओअपडेट्स : सानिया-प्रार्थना पराभूत

07 ऑगस्ट : सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरे या जोडीला रिओ ऑलिंपिकच्या टेनिसमध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. सानिया-प्रार्थना या जोडीला चीनच्या शुआई पेंग आणि शुआई झैंग यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

महिला दुहेरीतील हा सामना पहिल्या सेटपासून अटीतटीचा झाला. पेंग आणि झेंग यांनी पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकल्यानंतर दुसरा सेट सानिया-प्रार्थनाने 7-5 असा जिंकल्यानंतर तिसर्‍या सेटमध्ये जोरदार लढत पहायला मिळाली. अखेर चीनच्या जोडीने हा सेट 7-5 असा जिंकत विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2016 04:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close