S M L

ऐतिहासिक; रिओ ऑलंपिकच्या व्हॉल्ट प्रकारात दीपा कर्माकर फायनलमध्ये

Samruddha Bhambure | Updated On: Aug 8, 2016 02:16 PM IST

ऐतिहासिक; रिओ ऑलंपिकच्या व्हॉल्ट प्रकारात दीपा कर्माकर फायनलमध्ये

08 आॅगस्ट :  रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून सातत्यानं निराशा होत असताना ऍथलिट दीपा कर्माकरनं ऐतिहासिक कामगिरी करत देशवासियांना सुखद धक्का दिला आहे. जिम्नॅस्टिक वॉल्ट या प्रकारात दीपानं अंतिम फेरी गाठली आहे. आता भारतीय प्रमाणवेळेनुसार, 14 ऑगस्टला रात्री 11.15 वाजता जिम्नॅस्टिक व्हॉल्ट प्रकाराची अंतिम फेरी होणार आहे. तिथे दीपा इतिहास रचणार का, याकडे देशाचं लक्ष लागलंय.

रिओ ऑलिंपिकमध्ये हॉकी आणि रोइंग वगळता भारताच्या पदरी निराशाच आली आहे. त्यात महिला तिरंदाजांनीही नेम चुकवला असताना, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दीपा कर्माकरनं जिम्नॅस्टिक व्हॉल्टच्या अंतिम फेरीत धडक मारली. पात्रता फेरीत 14.850 गुण मिळवत दीपाने आठवं स्थान पटकावलं. जिम्नॅस्टिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

अनइव्हन बार, बॅलेंसिंग बीम आणि फ्लोअर एक्सरसाईज या तीन प्रकारांत दीपाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. पण, व्हॉल्ट प्रकारात पहिल्या प्रयत्नांत 15.100 गुणांची नोंद केली. दीपाने अनइव्हन बारमध्ये 11.666, बॅलन्सिंग बिममध्ये 12.866 आणि फ्लोअर एक्सरसाईजमध्ये 12.033 गुण मिळविले. कॅनडाच्या प्रतिस्पर्ध्यांनी मोक्याच्या क्षणी दर्जेदार खेळ केल्यानं दीपा सहाव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर गेली. पण तिनं अंतिम फेरी गाठत पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

  • दीपा कर्माकर त्रिपुराच्या आगरतळा इथली राहणारी
  • वयाच्या सहाव्या वर्षापासून आर्टिस्टिक जिमनॅस्टिकमध्ये
  • 2011च्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये 5 सुवर्ण पदकांची कमाई
  • 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई
  • 2015च्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2016 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close