S M L

पदकामागे जीवघेणी 'धाव', समीर सैदचा पाय मोडला

Sachin Salve | Updated On: Aug 8, 2016 05:18 PM IST

पदकामागे जीवघेणी 'धाव', समीर सैदचा पाय मोडला

08 ऑगस्ट : रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे हे प्रत्येक खेळाडूंचं स्वप्न...पण या स्वप्नामागे धावणार्‍या एका खेळाडूला मोठी किंमत चुकावावी लागली. फ्रेंच जिम्नॅस्ट समीर सैदनं कसरतीसाठी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात त्याचा एक पाय अक्षरश: दुमता झाला. गुडघ्यापासून घोट्यापर्यंत तो मधातच वाकलाय.

पण खेळाडूंचं स्पीरीट किती उंच असू शकतं तेही समीरनं दाखवून दिलंय. कारण रिओ ऑलिम्पिकमधून जरी बाहेर पडलो असलो तरीसुद्धा ह्याच पायांवर मी टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल असं सव्वीस वर्षीय समीर सैदनं म्हटलंय. विशेष म्हणजे समीरवर त्यानंतर तातडीनं सर्जरी करण्यात आलीय. ती यशस्वीही झालीये. दुखापत झाली असलीसुद्धा इतक्यात रिओ सोडणार नसल्याचंही समीरनं स्पष्ट केलंय. त्याचे साथीदार क्वालिफाय झालेत आणि फ्रेंच पथकाचं मनोबल वाढवण्यासाठी समीर आता प्रयत्न करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2016 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close