S M L

विकासाचा महामार्ग

विनोद तळेकर, मुंबईमहाराष्ट्राच्या इतिहासात 5 एप्रिल 2000 मध्ये महत्वाचा अध्याय जोडला गेला. या दिवशी मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्राची दोन महत्वाची शहरं एकमेकांना एक्सप्रेस हायवेने जोडली गेली. त्यावेळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचा यात मोठा वाटा आहे. मुंबई...महाराष्ट्राची नाही तर देशाची आर्थिक राजधानी. त्याच तोडीचं महाराष्ट्रातलं दुसरं शहर म्हणजे पुणे..महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब म्हणून नावारुपाला आलेलं हे शहर... गेल्या दहा वर्षात या दोन शहरांचा झपाट्यानं विकास झाला...हा पुरक विकास शक्य झाला या शहरांना जोडणार्‍या मुंबई पुणे एक्सप्रेस वे मुळे....जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर होणार्‍या अपघातांच्या प्रचंड संख्येमुळे या एक्सप्रेस हायवेची गरज निर्माण झाली. कारण या अपघातातल्या मृत्यूचा आकडा होता दरवर्षी 400 इतका. नव्या एक्सप्रेसवेमुळे या अपघातांच्या संख्येत घट तर झालीच, शिवाय या दोन महानगरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर झाला. रिट्स ऍन्ड स्कॉट विल्सन या ब्रिटीश कंपनीने 1994 मध्ये चार वर्ष अभ्यास करून या एक्सप्रेस हायवेबाबतचा एक अहवाल राज्य सरकारकडे सादर केला. 1997 मध्ये एमएसआरडीसीने या कामाची जबाबदारी घेतली. त्यांनी आठ भागात कामाची विभागणी केली आणि निविदाही मागवल्या. त्यासाठी अंदाजित खर्च होता 1146 कोटी रुपये...सरकारी तिजोरीची परिस्थिती पाहता ते शक्य नव्हतं...मग बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा म्हणजेच बीओटी तत्वाची कल्पना पुढे आली. 1998 मध्ये या कामाची पहिली वर्क ऑर्डर निघाल्यावर या कामाला खर्‍या अर्थानं गती आली. त्यानंतर 1999 ला खंडाळा घाट विस्तारीकरण, लोणावळा बायपास आणि एक्सप्रेस हायवेच्या शेवटच्या टप्प्याचं कामाच्या वर्कऑर्डर्सही दिल्या गेल्या. वर्षभरातच एक भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आणि 2002 मध्ये संपूर्ण एक्सप्रेस हायवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.93 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प पूर्ण झाला तेव्हा खर्चाचा आकडा होता 1630 कोटी रूपये. भौगोलिक दृष्ट्या आव्हानात्मक वाटणार्‍या या मार्गावर कोकण रेल्वेच्या मदतीने बोगद्यांचं काम पूर्ण करण्यात आलं. अद्ययावत मशिन्सच्या साहाय्यानं एक विकासमार्ग साकारला गेला...या मार्गाची वैशिष्ट्यही खूप आहेत. भारतातला हा पहिला सहा पदरी महामार्गअसून याचं बांधकाम आंतरराष्ट्रीय निकषानुसार झालं आहे. देशातील सर्वाधिक सुरक्षित महामार्ग असा नावलौकीक असलेल्या या मार्गावर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना पूर्ण मज्जाव आहे. अपघातानंतर त्वरीत वैद्यकीय उपचार मिळतील अशी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त 93 किमी अंतरादरम्यान या मार्गावर 7000 नवीन झाडं लावण्यात आलीत. तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पाच बोगदयांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी विशेष यंत्रणा बसवण्यात आली आहे.एमएलआरडीसीने आता एक्सप्रेस हायवेची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कळंबोलीपासून सुरू होत असलेल्या या मार्गाची सुरूवात सायनपासून व्हावी, यासाठी सायन पनवेल मार्गाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. तसंच आताच्या वाशी मानखुर्द पुलाला लागूनच आणखी एक नवा पूल उभा करण्यात येत आहे. सप्टेंबर 2011 पर्यंत हे काम पूर्ण झाल्यावर मुंबई - पुणे अंतर आणखी अर्ध्या तासाने कमी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2010 04:08 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2010 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close