S M L

अभिनव बिंद्राची नेमबाजीच्या फायनलमध्ये धडक, गगन नारंग मात्र बाहेर

Sachin Salve | Updated On: Aug 8, 2016 09:49 PM IST

अभिनव बिंद्राची नेमबाजीच्या फायनलमध्ये धडक, गगन नारंग मात्र बाहेर

08 ऑगस्ट : रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाचा दावेदार मानला जाणार्‍या अभिनव बिद्रानं 10 मीटर एअर रायफल प्रकारात फायनलमध्ये धडक मारलीये. अभिनव बिंद्रानं आठव्या स्थान पटकावत, नेमबाजीत भारताच्या पदकाची आशा जिवंत ठेवलीये. तर दुसरीकडे गगन नारंग मात्र फायनलपर्यंत पोहचवू शकला नाही.

भारताकडून अभिनव ब्रिंदाने पहिलाय सीरिजमध्ये 104.4, तिसरी 105.9, चौथी 103.8, पाचवी 102.1 आणि सहाव्या अंतिम सीरिजमध्ये 105.2 गूण मिळवले आहे. एकूण 625.7 गूण मिळवून फायनलमध्ये धडक मारली आहे. अभिनव बिंद्राने सातव्या स्थानावर जागा बनवलीये.

तर दुसरीकडे गगन नारंगने पहिल्या सीरिजमध्ये 105.3 आणि दुसरी 104.5 गुण मिळवले. पण तिसर्‍या 102.1, चौथ्या 103.4, पाचव्या 101.6 आणि सहाव्या प्रयत्नात 104.8 गूण मिळवले. नारंगचा एकूण स्कोअर हा 621.7 राहिला. त्याला 23 व्या नंबरवर समाधान मानावे लागले.

विशेष म्हणजे या स्पर्धेत 6 खेळाडूच फायनलसाठी क्वालिफाय होऊ शकता. यात बिंद्राने फायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलंय. तर नारंगला बाहेरचा रस्ता पकडावा लागला. आता रात्री 8.30 वाजता फायनलाचा मुकाबला होणार आहे त्यामुळे बिंद्राकडून अपेक्षा वाढल्या आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2016 07:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close