S M L

सेना मंत्र्यांसाठी उद्धव ठाकरे 'वर्षा'वर, प्रलंबित कामाची यादी सोपवली मुख्यमंत्र्यांकडे !

Sachin Salve | Updated On: Aug 8, 2016 10:56 PM IST

सेना मंत्र्यांसाठी उद्धव ठाकरे 'वर्षा'वर, प्रलंबित कामाची यादी सोपवली मुख्यमंत्र्यांकडे !

08 ऑगस्ट : शिवसेना नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवास्थानी बैठक पार पडली. यावेळी सेनेच्या आमदारांच्या प्रलंबित कामाची यादी मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आलीये. तसंच आमदारांच्या प्रलंबित कामासाठी एक समितीही स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेना आणि भाजपमधील धुसफूस काही कमी होत नाहीये. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर भाजप आणि शिवसेना नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपचे जेष्ठ नेते अणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे सर्व मंत्री आणि प्रतोद उपस्थित होते. शिवसेनेच्या आमदारांची कामं होत नसल्यामुळे ते नाराज होते, त्यासाठी आजची बैठक घेण्यात आली. आमदारांच्या प्रलंबित प्रश्नांची यादी करून ती यावेळी मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आली. यापुढेही प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची समिती स्थापन करून मुख्यमंत्र्यांशी समन्वय साधला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दर 3 महिन्यांनी अशा बैठका घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे या बैठकीसाठी वर्षावर हजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2016 10:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close