S M L

विस्तारित ठाणे स्टेशनला अखेर हिरवा कंदील

Sachin Salve | Updated On: Aug 9, 2016 04:54 PM IST

विस्तारित ठाणे स्टेशनला अखेर हिरवा कंदील

ठाणे, 09 ऑगस्ट : ठाण्यासाठी नवीन विस्तारीत स्टेशनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिलाय. त्यामुळे ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलच्या भूखंडावर हे नवीन स्टेशन उभं राहणार आहे. यासाठी मेंटल हॉस्पिटल आणि महापालिकेची जागा मिळून 14 एकरावर हे स्टेशन उभं राहणार आहे.

मध्य रेल्वेवरचं सर्वात जास्त गर्दीचं स्टेशन म्हणून ठाणे स्टेशनची ओळख आहे. मेंटल हॉस्पिटलच्या जागेवर स्टेशन उभारलं गेल्यास ठाणे स्टेशनवरील प्रवाशांचा भार कमी होणार आहे. शिवाय ठाणेकरांनाही प्रवास सोईचा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार असल्यानं ठाणेकरांत आनंदाचं वातावरण आहे. येत्या महिन्याभरात जागा हस्तांतरण करण्यात येणार आहे. या स्टेशनमुळे वागळे इस्टेट, लुईसवाडी, कोपरी, पोखरण रोड, ढोकाळी, घोडबंदर रोड आणि मुलुंडमधलं आनंद नगर, नीलम नगर, सीमेंट कॉलनीला फायदा होईल.

हे स्थानक नेमकं कुठे असणार ?

ठाणे आणि मुलुंडच्यामध्ये हे नवं स्थानक येणार आहे. ज्ञानसाधना कॉलेजच्या शेजारी आणि मुलुंडच्या सीमेंट कॉलनीपुढे हे स्टेशन उभारलं जाईल. या स्थानकाच्या बरोबर वर ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आहे. त्यामुळे जर नव्या जागी चांगले रिक्षा स्टँड आणि बस डेपो बनवले, तर खर्‍या अर्थानं प्रवाशांची सोय होणार आहे. कारण पोखरण रोड आणि घोडबंदर रोडच्या रहिवाशांना हे स्थानक वापरायचं असेल, तर त्यांना बस किंवा रिक्षाला पर्याय नाही. तसंच मुलुंडच्या रहिवाशांनाही हे सोयीस्कररित्या वापरता येईल, याची काळजी रेल्वेनं घेणं गरजेचं आहे. यानं मुलुंड स्टेशनवरचा लोडही कमी होईल.

या भागांना सर्वात जास्त फायदा

- वागळे इस्टेट, लुईसवाडी, कोपरी, पोखरण रोड, ढोकाळी, घोडबंदर रोड

- मुलुंडमधलं आनंद नगर, नीलम नगर, सीमेंट कॉलनी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2016 04:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close