S M L

झाकिर नाईक धर्म परिवर्तन करण्यास प्रवृत्त करायचा, पोलिसांचा मुख्यमंत्र्यांकडे अहवाल

Sachin Salve | Updated On: Aug 9, 2016 06:54 PM IST

zhakir_naik09 ऑगस्ट : वादग्रस्त इस्लामी विचावंत झाकिर नाईकबद्दलचा अहवाल मुंबई पोलिसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे. 71 पानांच्या या अहवालात झाकिर नाईकवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. झाकिर नाईक इतर धर्मियांना धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त करायचा असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय.

केरळाहून परदेशात पळालेल्या युवकांचा आयसिसशी संबंध असल्याप्रकरणी झाकिर नाईकच्या कर्मचार्‍याला अटक करण्यत आली होती त्यामुळे झाकिर नाईकच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अतिरेकी कारवाई करणार्‍या लोकांसाठी वापरल्या जाणार्‍या अनलॉफूल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट अर्थात UAPA अंतर्गत झाकिरच्या गेस्ट रिलेशन अधिकारी अर्षीद कुरेशीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काय आहे या अहवालात ?

- 71 पानांचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे सादर

- दुसर्‍या धर्माच्या लोकांना धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रवृत्त करणं

- केरळहून परदेशात पळालेल्या युवक प्रकरणी डॉ.झाकीर नाईकच्या गेस्ट रिलेशन ऑफीसरला अटक

- झाकिर नाईक वेगवेगळं उदहारण देऊन दहशतवादाचं समर्थन करतो

- काल नागपाडा पोलिसांनी नाईकचा गेस्ट रिलेशन ऑफीसर अफसर अर्षीद कुरैशी विरुद्ध UAPA नुसार गुन्हा नोंद केला

- क्राईम ब्राँच अर्शदची चौकशी करतंय

- एकूण 71 पानांचा तपास रिपोर्ट मुंबई पोलिसांनी तयार केला आहे

- नाईकच्या संस्थेला मिळणार्‍या पैशांचा तपास EOW करतंय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2016 06:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close