S M L

खड्डे पडणार नाहीत असं कंत्राटदारांकडून लेखी घ्या,कोर्टाने पालिकेला फटकारलं

Sachin Salve | Updated On: Aug 9, 2016 07:17 PM IST

खड्डे पडणार नाहीत असं कंत्राटदारांकडून लेखी घ्या,कोर्टाने पालिकेला फटकारलं

मुंबई, 09 ऑगस्ट : मुंबईतल्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे असल्याने वांद्रे ते बोरिवली हा प्रवास करण्यासाठी दोन दोन तास लागतात. त्यामुळे याला जर आळा घालायचा असेल तर रस्ते कंत्राटदारांकडून कोणत्याही परिस्थितीत खड्डे पडणार नाहीत हे लेखी आणून द्या किंवा आम्ही तसे आदेश देऊ अशा शब्दांत हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले आहे. यावर कंत्राटदारांची पोलिसांमार्फत चौकशी सुरू असल्याचं महापालिकेनं कोर्टाला सांगितलं.

भाजप मुंबईचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी रस्ते घोटाळा आणि नालेसफाई घोटाळयाची एसीबीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी याचिका केली आहे. या याचिकेच्या सुनवाणी दरम्यान कोर्टाने हे आदेश दिले आहेत. दरम्यान,मुंबई उपनगरातील पावसाचा अंदाज येण्यासाठी उपनगरात डॉप्लर लावल्यास नेमकी माहिती मिळून लोकांना तशी सूचना करता येईल या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू होती. त्यावेळी मुंबईतील रस्त्यांवरील खड्‌ड्यासंदर्भात हायकोर्टाचे न्यायाधिश विद्याधर कानडे यांनीदेखील नाराजी व्यक्त केलीये. या खड्‌ड्यांमुळे आपल्याला पाठीचा त्रास झाल्याचं न्यायमूर्ती कानडे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2016 07:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close