S M L

हिरानंदानी हॉस्पिटल किडनी रॅकेट प्रकरणी 5 डॉक्टरांसह सिईओला अटक

Sachin Salve | Updated On: Aug 9, 2016 11:06 PM IST

हिरानंदानी हॉस्पिटल किडनी रॅकेट प्रकरणी 5 डॉक्टरांसह सिईओला अटक

मुंबई, 09 ऑगस्ट : हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये किडनी रॅकेट प्रकरणी 5 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या पाच डॉक्टरांसह

एका सिईओलाही अटक करण्यात आलीये.

पोलीस तपासाच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. पवई पोलिसांनी मानवी अंग तस्करी कायदा 1994 अंतर्गत ही कारवाई केलीये. उद्या या सर्व आरोपी डॉक्टर्सना अंधेरी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या डॉक्टरांचं हे रॅकेट किती दिवसांपासून सुरू होतं आणि त्यांनी आतापर्यंत किती जणांचं प्रत्यारोपण केलंय याचा तपास पोलीस करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2016 10:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close