S M L

अमेरिकेचा जलतरणपटू मायकल प्लेप्सला कारकिर्दीतील 21वं सुवर्णपदक!

Samruddha Bhambure | Updated On: Aug 10, 2016 03:04 PM IST

अमेरिकेचा जलतरणपटू मायकल प्लेप्सला कारकिर्दीतील 21वं सुवर्णपदक!

140930-michael-phelps-1358_ce1d95c110ffc5f9b96a1d1a8b536481.nbcnews-fp-1240-520

10 ऑगस्ट : अमेरिकेचा अव्वल जलतरणपटू मायकेल फेल्प्स याने आज (बुधवारी) 200 मीटर बटरफ्लाय आणि 4x200 फ्री स्टाईल प्रकारात सुवर्ण पदक मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला. फेल्प्सने 70 मिनिटांत 2 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सुवर्णपदक मिळवण्याची किमया साधली. 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात फेल्प्सने रिओ ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवलं तर त्यानंतर तासभराने झालेल्या 4x200 फ्री स्टाईल प्रकारात त्याने आपल्या साथीदारांसह सोनेरी कामगिरी केली.

या सुवर्णपदकासह फेल्प्सच्या ऑलिम्पिकमधील एकुण पदकांची संख्या 25 वर पोहोचली आहे. यामध्ये 21 सुवर्णपदकांचा समावेश आहे. फेल्प्सला सोमवारी झालेल्या 4x100 मी. फ्री-स्टाईल रिले प्रकारात सुवर्णपदक मिळालं होते. 21 सुवर्णपदकांसह 25 पदकांची कमाई करणारा फेल्प्स हा जगातील पहिलाच जलतरणपटू ठरला आहे. फेल्प्स हा पाचव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला आहे.

 मायकल फेल्सची आजपर्यंतची सुवर्ण कामगिरी :

 • 2001 वर्ल्डचॅम्पियनशिप 1 सुवर्ण पदकांची कमाई
 • 2002 पॅन पॅसिफिक चॅम्पियनशिपमध्ये 3 सुवर्णपदकं
 • 2003च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 4 सुवर्णपदकं
 • 2004च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्णपदकं
 • 2005च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 5 सुवर्णपदकं
 • 2007च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 7 सुवर्णपदकं
 • 2008च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्णपदकं
 • 2009च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 5 सुवर्णपदकं
 • 2010च्या पॅन पॅसिफिक चॅम्पियनशिपमध्ये 5 सुवर्णपदकं
 • 2011च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 4 सुवर्णपदकं
 • 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये 4 सुवर्णपदकं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2016 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close